इचलकरंजीमध्ये मटक्याच्या अड्ड्यांवर पोलिसाचा छापा, 76 हजार रुपयांसह 6 मोबाईल जप्त

कोल्हापूर : इचलकरंजी येथे दोन ठिकाणी सुरु असलेल्या मटक्याच्या अड्ड्यांवर पोलीसांनी छापा टाकून तिघांना अटक करण्यात आले आहे. या छाप्यात एकूण 76 हजार रुपयांसह 6 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

सुभाष अग्रवाल (वय 70), प्रसाद निंबाळकर (वय 24), विनायक घट्टे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.त्यांच्याविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजी शहरात मागील काही दिवसांपासून अवैध धंदे जोमात सुरु आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी कारवाई करण्याचे ठरवले. दरम्यान, आसरा नगर येथील निशिगंध कॉलनीमधील सुभाष अग्रवाल यांच्या घरी मटका खेळला जात असल्याचे पोलिसांना समजले. ही माहिती समजताच बी. बी. महामुनी यांनी कारवाई करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सापळ रचत सुभाष अग्रवाल यांच्या घरावर छापा टाकला.

या कारवाईत सुभाष अग्रवाल यांच्या घरी सुरु असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर तब्बल 75 हजारांची रोकड मिळाली. तसेच, या ठिकाणाहून 6 मोबाईल जप्त करण्यात आले. दरम्यान, शहरात एकूण दोन ठिकाणी छापा टाकण्यात आला.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.