एकाच कुटुंबातील चौघांचा रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न; तिघांचा मृत्यू तर एक चिमुकली गंभीर जखमी

नालासोपारा :विरारच्या साईनाथ नगरमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांनी रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी पहाटे नालासोपारा ते वसईच्या दरम्यान येणाऱ्या रेल्वेखाली ही घटना घडली आहे. यात तिघांचा मृत्यू झाला आहे तर एक 10 वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

वसई रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. नंदा जगंम (वय 55), सोमनाथ (वय 31), प्रमिला (वय 35) अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. तर समीक्षा असं जमखी झालेल्या चिमुकलीचं नाव असून ती 10 वर्षांची आहे. आता पोलीस ही आत्महत्या तर नाहीये ना याचा तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.