बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

पिंपरी चिंचवड : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आली. त्याच्याकडून एक जिवंत पिस्तूल व जिवंत काडतूस असा एकूण ३० हजार २० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.18) दिघीतील मॅगझिन चौकात हि कारवाई करण्यात आली.

प्रणव सुरेश कांबळे (वय 21, रा. गुरुदेव नगर,आकुर्डी) असे
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक आशिष ज्ञानदेव बनकर यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपीने ३० हजार  २०० रुपये किंमतीचे विनापरवाना एक लोखंडी पिस्टल व एक जिवंत काडतूस जवळ बाळगले होते. पोलिसांनी आर्म अॅक्ट कलमाखाली त्याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास दरोडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भांगे करत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.