भिवंडीत ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेची गळा चिरुन हत्या

भिवंडी : भिवंडी शहरातील तीनबत्ती परिसरात असलेल्या हाफसन आळी परिसरात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे.ही घटना शनिवारी सकाळी घडली आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एक संशयित आरोपीला ताब्यात घेवून त्याची चौकशी केली जात आहे.

लक्ष्मी उर्फ पूजा भुरला (वय, 46) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली? याची माहिती अद्याप समजू शकली नाही. ओळखीतील व्यक्तीकडून या महिलेची हत्या करण्यात आला असावा, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,लक्ष्मी या ब्युटी पार्लरचा व्यवसाय करतात. त्यांच्या पतीचे निधन झाले असून त्या आपल्या मुलासोबत राहतात. शनिवारी सकाळी ही महिला घरात एकटीच होती. अज्ञात मारेकरूने महिलेच्या घरात घुसून तिच्या शरीरावर धारदार शस्त्रानं 9 ते 10 वार करत गळा चिरून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.  मयत महिलेचा मुलगा हा रात्रपाळीचे काम करत असल्याची महिती मिळत आहे. लक्ष्मी यांचा मुलगा रात्रपाळीचे काम आटपून शनिवारी सकाळी घरी परतला. त्यावेळी घराला लॉक होता. त्याने घराचा दरवाजा उघडून बघितले असता घरात लक्ष्मी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्याला दिसला.या घटनेमुळे मुलाला प्रचंड धक्का बसला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

त्यानंतर त्याने स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती होताच पोलीस व फॉरेंसिक लॅबचे पथक दाखल होऊन पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरु असून ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याची माहिती अद्याप समजू शकली नाही.

दरम्यान, ओळखीतील व्यक्तीकडून महिलेचा खून करण्यात आला असावा, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. विशेष म्हणजे महिलेच्या घराचा दरवाजा आतून उघडण्यात येऊन महिलेची हत्या करण्यात आली आहे. घरातील एकही वस्तूची चोरी गेलेली नाही. शहर पोलीस या घटनेचा सखोल तपास करीत आहेत. तसेच लवकरच या घटनेतील आरोपीला पकडण्यात येईल, असाही विश्वासही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.