शिक्षकानेच केला २३ वर्षीय मुलीचा विनयभंग, Whatsappवर पाठवले अश्लील मेसेज

नवी दिल्ली : दिल्लीत एका ५२ वर्षीय संगीत शिक्षिकाने २३ वर्षीय विद्यार्थिनीचा छळ आणि विनयभंग केल्याचा आरोप आहे.याप्रकरणी दिलशाद गार्डनमधील रहिवासी असलेल्या या शिक्षकाला आता पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,पीडित मुलगी एका संगीत केंद्रात डिप्लोमा करत आहे तर आरोपी पखवाज (संगीत वाद्य) शिक्षक आहे. पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार, शिक्षकाने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि तिला व्हाट्सअॅपवर अश्लील संदेश पाठवले. पीडित महिला आणि तिच्या आईने १४ डिसेंबर रोजी चाणक्यपुरी पोलिसांकडे तक्रार नोंदविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पीडित महिलेने एफआयआरमध्ये म्हटले आहे की, प्रशिक्षण सत्रात शिक्षकाने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यानंतर १४ डिसेंबर रोजी आरोपीने तिच्या कंबरेवर हात ठेवून जबरदस्तीने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले.

पोलीस उपायुक्त (नवी दिल्ली) ईश सिंघल यांनी सांगितले की- “मुलीच्या तक्रारीच्या आधारे कलम ३५४, ३५४ A (लैंगिक छळ) आणि ५०९ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.” आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी सांगितले की ते संस्थेतील इतर विद्यार्थ्यांचीही जबाब नोंदवण्यात येत आहेत आणि याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.