सरकारचा अर्लट ! ‘या’ वेबसाइटवर चुकूनही करू नका क्लिक

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन व्यवहार वाढत आहेत. त्याला अधिक प्राधान्य दिलं जातं.  मात्र ऑनलाईन पद्धतीने पैशांची देवाण घेणवाम करताना अनेकदा फसवणुकीची शक्यता असते. मोठ्या प्रमाणात फ्रॉड केले जातात. देशभरात वाढलेली ऑनलाईन फ्रॉडची संख्या लक्षात घेता सरकारने बनावट वेबसाईटची एक यादी जाहीर केली आहे. जर तुम्ही देखील या वेबसाईटचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. नाहीतर तुमच्या खात्यातील रक्कम आणि तुमची  वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते.

तुम्ही या वेबसाइटवर व्हिजीट केल्यास मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे सावध राहा. फ्री स्कॉलरशीप किंवा फ्री लॅपटॉपचे आमीष दाखवणाऱ्या वेबसाईट्सचा देखील समावेश आहे. पीआयबी (PIB) आणि सरकारी तसेच खाजगी बँकांकडून वेळोवेळी या ऑनलाईन फसवणुकीबाबत सावध केलं जात. ग्राहकांनी या अलर्टकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पीआयबीने सहा वेबसाईटची लिस्ट जारी केली आहे.

PIB ने जारी केलेल्या यादीतील वेबसाईट्स

>> http://centralexcisegov.in/aboutus.php

>> https://register-for-your-free-scholarship.blogspot.com/

>> https://kusmyojna.in/landing/

>> https://www.kvms.org.in/

>> https://www.sajks.com/about-us.php

>> https://register-form-free-tablet.blogspot.com/

कोरोना काळात सर्वाधिक प्रमाणात चुकीच्या बातम्या, बनावट मेसेज व्हायरल करण्यात आले आहेत. याबाबत सामान्यांना माहिती असेलच असं नाही, अशावेळी सरकारचे प्रेस इन्फरमेशन ब्युरो वेळोवेळी खोट्या बातम्यांबाबत अलर्ट करत असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजबाबतही फॅक्ट चेक करण्याचं काम PIB कडून केलं जातं. सरकारकडून पीआयबीच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवण्यापासून वाचण्याचा प्रयत्न केला जात आहे. फसवणूक करणाऱ्या बातम्यांबाबत पीआयबीकडून सामान्य जनतेला जागरुक केलं जातं.

तुम्हाला एखादा मेसेज आल्यास करू शकता फॅक्ट चेक

सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे [email protected] या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेता येते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.