अवैधरित्या दारु विक्री करणा-या चायनिज सेंटर व खुशबू हॉटेलवर पोलिसांचा छापा

पिंपरी चिंचवड :  हिंजवडी येथील चायनीज सेंटर आणि हॉटेलवर दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी छापेमारी करत पोलिसांनी १ लाख २७ हजार ९०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुुरक्षा पथकानं ही कारवाई केली आहे.

योगेश राघु वाडेकर (वय ३२, रा. हिंजवडी) आणि प्रभाकर गाणीग (वय ३२, रा. हिंजवडी) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी वाडेकर हा स्वरा चायनिज अँड तंदूर पॉईंट या चायनीज सेंटरचा चालक आहे. तर आरोपी गाणीग हा खुशबू कबाब करी अँड बिर्याणी रेस्टॉरंट या हॉटेलचा चालक आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,सदर आरोपी हे चायनीज सेंटर आणि हॉटेलमध्ये अवैध दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापेमारी केली. यात १० हजार ५० रुपये रोख रक्कम, ९८ हजार ३५६  रुपये किंमतीच्या देशीविदेशी दारुच्या व बिअरच्या बाटल्या ,१९ हजार ५०० रुपये किंमतीचे ०३ मोबाईल असा एकूण १ लाख २७ हजार ९०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दोन्ही आरोपी विरुध्द हिंजवडी पोलीस ठाण्यात कलम १८८, २६९, ३४ महा. दारु. बंदी कायदा कलम ६५ (ई), साथीचा रोग अधिनियम १८९७ कलम ३, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम २००५ चे कलम ५१ (ब), महा कोविड १९ उपाययोजना २०२० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हिंजवडी पोलीस  करीत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधिर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त. श्रीमती प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि डॉ. अशोक डोंगरे, सपोनि निलेश वाघमारे, पोउनि धैर्यशिल सोळंखे, सपोफी विजय कांबळे, पोहवा सुनिल शिरसाठ, पोहवा संदिप गवारी, पोहवा संतोष असवले, पोना दिपक सावळे, पोना भगवंता मुठे, पोना अनिल महाजन, पोना महेश बारकुले, पोना अमोल शिंदे, मपोना वैष्णवी गावडे, मपोना संगीता जाधव, पोशि योगेश तिडके, पोशि विष्णू भारती, पोशि मारुती करचुंडे, पोशि मारोतराव जाधव, पोशि गणेश कारोटे, पोशि राजेश कोकाटे, मपोशि सोनाली जाधव यांनी केली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.