आयुर्वेदिक दवाखान्यात काम विचारण्यासाठी गेलेल्या महिलेचा डॉक्टरनेच केला विनयभंग

पुणे : आयुर्वेदिक दवाखान्यात काम विचारण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा डॉक्टरनेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कर्वेनगरमध्ये घडली आहे. संबंधित डॉक्टरने महिलेला तुम्हाला मसाज करता येतो का, मी तुम्हाला मसाज शिकवितो असे म्हणत महिलेचा विनयभंग केला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. डॉ. मंदार रमेश अत्रे (वय ४८, रा. अमृतसिद्धी सोसायटी, कर्वेनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्वेनगरमध्ये डॉ. मंदारचा आयुर्वेदिक दवाखाना आहे. त्याच्या दवाखान्यात एक महिला कामा आहे का? याची विचारणी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी डॉ. मंदारने संधी साधून तुम्हाला मसाज करता येतो का? असे म्हणत महिलेच्या अंगाला स्पर्श केला. त्यानंतर त्यांनी ड्रॉव्हरमधील पैसे दाखवून महिलेला दुपारी दीड वाजता येता का? अशी विचारणा करीत तिचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पीडितीने आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.