नालासोपऱ्यात चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत चोरट्याना अटक, ३.३४ लाखाचा मुद्देमाल जप्त

मुंबईः नालासोपऱ्यात चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत चोरट्याना तुळींज पोलीसांनी अटक केली आहे. दोन्ही चोरट्यांकडून  3 लाख 34 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मनवर माहेबूब शेख (वय 19) आणि अमजत बफाशीर खान (वय21) असे अटक केलेल्या आरोपींची नाव असून हे दोघेही नालासोपारा पूर्वेकडील राहणारे आहेत.हे दोन्ही चोरटे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यांच्याकडून आणखी मोठ्या गुन्ह्याचा उकल होण्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,सकाळ संध्याकाळच्या वेळेत महिला, ज्येष्ठ नागरिक, कामावर जाणारे प्रवाशांवर पाळत ठेवून हे दोघेजण भरघाव वेगात मोटारसायकलवर येऊन, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यातील सोन्याची साखळी, मंगळसूत्र आणि इतर दागिने हिसकावून फरार होत होते.

मागच्या 4 महिन्यापासून तुळींज पोलिस स्टेशन हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगचे प्रमाण वाढले होते. यालाच आळा घालण्यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेऊन या दोघांना ताब्यात घेऊन तपास केला. त्यानंतर तुळींज पोलिस ठाण्यातील 6 गुन्हे केले असल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. या चोरट्यांकडून 2 लाख 24 हजार रुपये किंमतीचे सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र, 1 लाख 10 हजार रुपये किंमतीच्या तीन मोटारसायकल असा एकूण 3 लाख 34 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. आणखी काही गुन्हे या आरोपिकडून उघड होतात का याचा तपास तुळींज पोलिस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.