बंदूकीचा धाक दाखवत हॉटेलमधील दोन महिला कर्मचाऱ्यांवर सामूहिक बलात्कार

राजस्थान : बंदूकीचा धाक दाखवत हॉटेलमधील दोन महिला कर्मचाऱ्यांवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजस्थान मधील भिवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी शुक्रवारी हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि हॉटेल मॅनेजरला त्यांनी सेक्स वर्कर्सची व्यवस्था करण्यासं सांगितलं. काही वेळानंतर दोन आरोपी जबरदस्तीने एका रूममध्ये शिरले जेथे महिला कर्मचारी झोपल्या होत्या. मग, आरोपींनी बंदूकीचा धाक दाखवत दोन्ही महिलांवर बलात्कार केला तर त्यांचे इतर तीन सहयोगी हे तेथेच उपस्थित होते.

 

दरम्यान, हॉटेल मॅनेजरने या प्रकरणी पोलिसांत धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर भिवाडीचे पोलीस अधिक्षक राममूर्ती जोशी यांनी पोलिसांच्या टीम तयार केल्या आणि हॉटेलला घेरलं. मग पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला आणि दोन्ही महिलांची सुटका केली. तर पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

व्यापाऱ्याच्या हत्येची आखत होते योजना

पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की, या आरोपींनी एका व्यापाऱ्याकडून २० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. हे पैसे देण्यास व्यापाऱ्याने नकार दिला त्यानंतर पाचही आरोपी या व्यापाऱ्याची हत्या करण्याची योजना आखत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाच आरोपींपैकी गुर्जर हा यापूर्वी हत्येच्या आरोपाखाली कारागृहात शिक्षा भोगत होता, एप्रिल महिन्यात त्याची सुटका झाली. पोलिसांनी या आरोपींकडून दोन पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.