सर्वसामान्यांसाठी मोठी बातमीः नव्या वर्षात मिळणार ATM कार्ड सारखं स्मार्ट रेशन कार्ड

नवी दिल्ली : आता तुमचं रेशन कार्ड ATM सारख होणार आहे. एक नेशन एक रेशन कार्ड योजने अंतर्गत आता नव्या वर्षात नव्या रुपात ATM कार्ड दिसणार आहे. केंद्र सरकारने रेशन कार्डमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारकडून जवळपास 84 कोटी नागरिकांना आता ATM कार्ड सारखं स्मार्ट रेशन कार्ड दिलं जाणार आहे. त्याची सुरुवात बिहारमधून केली जाणारा आहे.

एक नेशन एक रेशन कार्ड योजनेचा फायदा देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर तुमचं रेशन कार्ड आता देशातील कुठल्याही राज्यात चालणार आहे. त्यामुळे नोकरीसाठी अन्य राज्यांत गेलेल्या नागरिकांना, विस्थापित झालेल्या मजुरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत देशातील 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे.

वन नेशन वन रेशन कार्ड’चे फायदे : वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत सध्या जुन्या कार्डवरच धान्य मिळत आहे. तुम्ही ज्या राज्यात आहात, तिथे तुमच्या जवळील रेशन दुकानदाराकडे जाऊन तुम्ही रेशन कार्ड बनवू शकता. तिथे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज देखील करता येऊ शकतो.

योजनेचा फायदा कसा मिळवाल : तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही आधार कार्ड लिंक करुनही रेशनचा लाभ मिळवू शकता. त्यासाठी तुमच्याकडे बीपीएल कार्ड असणं गरजेचं आहे. त्यासह काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. रेशन कार्ड बनवण्यासाठी प्रत्येक राज्याचे वेगवेगळे पोर्टल आहेत. त्यावर बीपीएल कार्डधारक रेशन कार्डसाठी अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मिळालेली पोचपावती तुम्हाला तहसील कार्यालयात अन्न पुरवठा अधिकाऱ्याकडे द्यावी लागणार आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.