हळदीचा कार्यक्रमात तलवार घेऊन नाचणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक
जळगाव : हळदीच्या कार्यक्रमात हातात तलवार घेऊन नाचणारा सराईत गुन्हेगाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. हा सराईत गुन्हेगार तलवार घेवून दहशत माजवित असतांना पोलिसांनी त्याला अटक केली आहे.प्रमोद इंगळे (वय २६, रा. हरिविठ्ठलनगर) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. पोलिस कर्मचारी पंकज शिंदे यानी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी प्रमोद इंगळे हा काही दिवसांपूर्वी लग्नातील हळदीच्या डीजेच्या कार्यक्रमात हातात तलवार घेऊन नाचत होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा सकाळच्या सुमारास हातात तलवार घेऊन बाजारपट्ट्याजवळ आरडाओरड करून दहशत माजवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी पंकज शिंदे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना देताच त्यांनी प्रदीप पाटील, गोरखनाथ बागूल, महेश महाजन, विजय पाटील यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले.पोलिसांच्या पथकाने प्रमोद इंगळेला अटक करीत त्याच्याकडून दोन हजार रुपये किमतीची धारदार तलवार हस्तगत केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!