अवैधरित्या हुक्का व दारू विक्री करणा-याा हॉटेलवर पोलीसांचा छापा
पिंपरी चिंचवड : अवैधरित्या हुक्का व दारू विक्री करणा-याा हॉटेलवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून हुक्का साहित्य, दारू, पैसे आणि मोबाईल फोन असा एकूण एक लाख 379 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रावेत परिसरातील भोंडवे कॉर्नरजवळ असलेल्या गुणाजी व्हेज नॉनव्हेज नावाच्या ढाब्यावर करण्यात आली.
ढाबा मालक नरेश मारुती भोंडवे (वय 31, रा. रावेत), मॅनेजर शरद यशवंत पाटील (वय 45, रा. शिंदेवस्ती, रावेत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत परिसरातील भोंडवे कॉर्नरजवळ असलेल्या गुणाजी व्हेज नॉनव्हेज नावाच्या ढाब्यात अवैधरित्या दारू आणि हुक्का विक्री सुरु असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ढाब्यावर छापा टाकला. त्यात पोलिसांनी 39 हजार 520 रुपये रोख रक्कम, 19 हजार 594 रुपयांच्या देशी, विदेशी दारू आणि बिअरच्या बाटल्या, 13 हजार 265 रुपयांचे चार हुक्का पॉट, हुक्का पिण्याचे इतर साहित्य, 28 हजारांचा एक मोबाईल फोन असा एकूण एक लाख 379 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि धैर्यशिल सोळंके, पोहवा सुनिल शिरसाठ, पोना नितीन लोंढे, पोना भगवंत मुठे, पोना अनिल महाजन, मपोना संगीता जाधव, पोशि मारुती करचुंडे, पोशि विष्णू भारती, पोशि राजेश कोकाटे, पोशि योगेश तिडके, पोशि मारोतराव जाधव, मपोशि सोनाली जाधव यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!