वर्हाडी सोडाच,भाजप आमदार राम सातपुतेंच्या लग्नाला स्टेजवरच पंन्नासच्या वर लोक

पुणे : भाजप आमदार राम सातपुतेंचा विवाह सोहळा पुण्यात थाटामाटात पार पडला, या जंगी विवाह सोहळ्यात राज्यातील बड्या नेत्यांनी हजेरी लावली, या सोहळ्याची गर्दी पाहता हजारोंच्या संख्येने वर्हाडी जमलेली पाहण्यात आले,ऐरवी सामान्यांच्या विवाह सोहळ्यात अगदी तंतोतंत लोक आली का नाही पाहणारे आणि प्रसंगी गुन्हाही नोंद करणाऱ्या पोलीस मंडळींनी मात्र या विवाह सोहळ्यात झोपेचे सोंग घेतल्याचे दिसुन आले.

विवाह सोहळ्यात ५० हून अधिक पाहुणे उपस्थित राहू नये, असा नियम आहे. मात्र, भाजपचे आमदार राम सातपुते  यांच्या शाही विवाह सोहळ्यात गर्दी मावत नसल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जुन हजेरी लावली

भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचा शाही विवाह पुण्यात मोठ्या थाटात पार पडला.पुण्यातील शुभारंभ लॉन्समध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला. विवाह सोहळ्याला तोबा गर्दी लोटली होती. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर, भाजप नेते हर्षवर्धन पाटील अशी खास मंडळी उपस्थित होते. पाहुणे तर दुरच पण नेते मंडळींकडूनही मास्क आणि शारीरिक अंतर या नियमांचं पालन झालं नसल्याचं समोर आलेल्या व्हिडिओतून स्पष्ट झालं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव असताना आणि अद्याप लस आली नसताना लोकप्रतिनिधीच कोरोनाबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर आहे, अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनाच ‘दो गज की दूरी, मास्क पेहनना है जरूरी’ चा विसर पडला. विवाह सोहळ्यात ५० जणांची मर्यादा पाळण्याचा नियम लोकप्रतिनिधींनीच मोडणे, हे खेदजनक आहे.

भाजप आमदार राम सातपुते आणि त्यांच्या पत्नी या दाम्पत्याला विवाह सोहळ्याच्या शुभेच्छा देताना वधू-वर आणि राजकीय वऱ्हाडी मंडळींनी मात्र ‘सर्वसामान्य माणसांना एक नियम आणि आपल्याला एक’ असं समजू नये. कारण कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी हे संकट टळलेले नाही. आणि लोकप्रतिनिधींदेखील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे सर्व नियम पाळावेत, एवढीच अपेक्षा पुणेकर व्यक्त करत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.