सांगवी पोलिस ठाण्यातील कर्मचारी लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, पोलिस दलात प्रचंड खळबळ

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड आयुक्तालयात एसीबी पथकाने धडक कारवाई करत एका कर्मचाऱ्याला 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकले आहे. कारवाईत वरिष्ठ असल्याच्या चर्चेने जिल्ह्यात तुफान खळबळ उडाली आहे. मात्र त्याबाबत अद्याप काहीच माहिती बाहेर आलेली नाही.

याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

तक्रारदाराला पोलीस संरक्षण देण्यासाठी पोलिसांनी 20 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी एसीबीच्या पथकाने सापळा लावून ही कारवाई केली आहे. संबंधित पोलिसासोबत पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याची एसीबीच्या पथकाकडून चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर नेमका प्रकार कळणार आहे. चौकशीसाठी वेळ लागणार असून चौकशीअंती सविस्तर माहिती देण्यात येईल, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.