केसनंद रोडवर पोत्यातून गांजाची वाहतूक करणाऱ्याला अटक, २० किलो गांजा जप्त
पुणे : मोटारसायकलवरुन पोत्यातून गांजाची वाहतूक करणाऱ्याला एकाला ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून २० किलो गांजा, २ मोबाईलसह मोटारसायकल असा ३ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
अंबु ऊर्फ अंबादास दशरथ पवार (वय ३५, रा. कोलवडी, ता. हवेली, मुळ रा. जेजला, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,अवैध धंद्यांवर कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्याकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले आहे. या पथकाला वाघोली ते केसनंद रोडवर एक मोटारसायकलस्वार संशयास्पदरित्या जाताना दिसून आला पोलिसांनी त्याला थांबविण्यास सांगितले असता तो न थांबल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. त्याच्या मोटारसायकलवर असलेल्या पांढऱ्या पोत्याची झडती घेतली असता त्यात गांजा आढळून आला. आरोपींकडून २० किलो गांजा, २ मोबाईलसह मोटारसायकल असा ३ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे.पुढील तपासासाठी आरोपीला लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्याकर घनवट, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक नेताजी गंधारे, उप निरीक्षक रामेश्वर धोंडगे, हनुमंत पडळकर, सहायक फौजदार दत्तात्रय जगताप, राजू पुणेकर, मुकुंद आयचित, प्रकाश वाघमारे, चंद्रकांत जाधव, बाळासाहेब खडके, समाधान नाईकनवरे, अक्षय जावळे, प्रसन्ना घाडगे, ज्योती बांबळे, सुनिता मोरे यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!