धडक कारवाईनंतर मुंबई पोलिसांचे ट्वीट करत पार्टी करणाऱ्यांना सूचक इशारा

मुंबई: मुंबई पोलिसांनी आज, पहाटे तीन वाजता ड्रॅगनफ्लाय क्लबवर धाड टाकली. कोविड 19 नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी 34 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात क्रिकेटपटू सुरेश रैना आणि इतर बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश असल्याचे कळते. या धडक कारवाईनंतर मुंबई पोलिसांनी एक  ट्वीट करत पार्टी करणाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांचे ट्वीटही जोरदार व्हायरल होत आहे.

मुंबईतील विमानतळाजवळ असलेल्या ड्रॅगन फ्लाय क्लबवर सहार पोलिसांकडून मध्यरात्री 2.30 वाजता ही कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांनी एएनआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “माजी भारतीय क्रिकेटर आणि इतर काही सेलिब्रेटींसोबत एकूण 34 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. करोनाशी संबधित नियमांचं पालन न केल्याने तसंच वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे,” असं पोलिसांनी म्हटलं होतं.

या घटनेचा संदर्भ देत मुंबई पोलिसांनी ट्विट करत रात्री उशिरापर्यंत पार्टी न करण्याबद्दल आधीच इशारा दिला आहे. ‘पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग!’, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

31 डिसेंबरला पनवेलमधील फार्महाऊसवर पडणार छापे

 

31 डिसेंबर रोजी नविन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबईच्या बाहेर जाण्याचे नियोजन दरवर्षी केले जातात. मुंबई , नवी मुंबईतील अनेकजण हाकेच्या आंतरावर असलेल्या पनवेल तालुक्यातील फार्महाऊसला पसंती देतात. पनवेल तालुक्यात 400 ते 500 फार्महाऊस असल्याने पोलीसांनी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मुंबईत नविन वर्षाच्या स्वगातावर काहीशे निर्बंध येणार असल्याने अनेकजण शहराबाहेरचा रस्ता धरतील. यामुळे ग्रामीण भागात असलेल्या फार्महाऊसवर रात्रभर धिंगाणा चालू नये यासाठी पोलीसांकडून सर्च ॲाफरेशन हाती घेण्यात येणार आहे. कोरोनाचे नियम डावलून फार्महाऊसवर गर्दी करीत पार्टी करणाऱ्यांवरर गुन्हे दाखल करण्याची तयारी पनवेल पोलीसांनी केली आहे. यासाठी 31 डिसेंबरच्या दरम्यान दोन तीन दिवस आधीपासून फार्महाऊसवर नजर ठेवण्यात येणार आहे. गरज पडल्यास छापामारी करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले आहे.

 

ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 अशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.