पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाचा चाकण आणि वाकड परिसरात छापा, 13 लाखाचा गुटखा जप्त

पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने चाकण आणि वाकड परिसरात दोन ठिकाणी छापा टाकून 13 लाख 29 हजार 251 रुपये किमतीच्या गुटख्यासह 36 लाख 79 हजार 916 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही कारवाईत 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताथवडे परिसरात नरसिंह कॉलनी येथे सामाजिक सुरक्षा विभागाने पहिली कारवाई केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 22) दुपारी पावणेपाच वाजता करण्यात आली. यात दलपत पत्ताराम भाटी (वय 27, रा. थेरगाव)याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी दलपत याने त्याच्या भाड्याच्या खोलीत गुटख्याची साठवणूक केली आहे. त्या गुटख्याची स्कोडाकार मधून वाहतूक करून विक्री करणार असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी (दि. 22) सापळा लावून दुपारी पावणे चार वाजता सापळा लावून कारवाई केली.

या कारवाईमध्ये पोलिसांनी 8 हजार 450 रुपये रोख रक्कम, 7 लाख 52 हजार 242 रुपये किमतीचा गुटखा, 7 लाख 20 हजारांची स्कोडा कार, 35 हजारांचा अॅपल कंपनीचा मोबाईल फोन, असा एकूण 15 लाख 15 हजार 692 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाने चाकण परिसरातील खालूंब्रे येथे आणखी एक कारवाई केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 22) दुपारी सव्वापाच वाजता चाकण-तळेगाव रोडवर खालूंबे येथे करण्यात आली. यात रामाराम करनाराम जाट (वय 24, रा. खालूंब्रे, ता.खेड), दिनेश भवरलाल भाटी (वय 24), मांगीलाल लख्खाराम चौधरी (वय 22, रा. सुदर्शननगर, चिंचवड), ओमप्रकाश वीरमाराम विष्णोई (रा.खालूबे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी बालाजी ट्रेडिंग कंपनी या दुकानात प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवला होता. त्यावर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली.

या कारवाईमध्ये पोलिसांनी पाच लाख 77 हजार 9 रुपये किमतीचा गुटखा, तंबाखू, सिगारेट, 72 हजार 215 रुपये रोख रक्कम, 16 लाख 50 हजार रुपये किमतीची तीन वाहने, 65 हजारांचे तीन मोबाईल फोन असा एकूण 21 लाख 64 हजार 224 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक,व्हि.के.कुबडे,सपोनि, निलेश वाघमारे, सपोनि, डॉ. अशोक डोंगरे,पोउनि धैर्यशिल सोळंके, सपोफौ. कांबळे, पोहवा सुनिल शिरसाठ, पोहवा संतोष असवले, पोहवा. संदिप गवारी, पोना नितीन लोंढे, पोना खेतले, पोना भगवंत मुठे, पोना अनिल महाजन,पोना महेश बारकुले, मपोना वैष्णवी गावडे, मपोना संगीता जाधव, मपोशि योगीनी कचरे, , पोशि मारुती करचुंडे, पोशि विष्णू भारती, पोशि. कारोटे, पोशि दिपक शिरसाठ, पोशि योगेश तिडके, मपोशि सोनाली माने यांनी केली आहे.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.