सावत्र आईने चिमुकल्याला गरम तव्यावर उभे करत चटके दिल्याची होती चर्चा पण…
बुलडाणा :नऊ वर्षीय चिमुकल्याला सावत्र आईने गरम तव्यावर उभे करून चटके दिल्याने बालक गंभीर जखमी झाल्याची घटना जवळा बाजार येथे घडल्याची चर्चा सोशल मीडियावर जोमात होती. दरम्यान, बोराखेडी पोलिसांनी रविवारी (ता.20) आर्यनची विचारपूस केली असता, शेकोटीमुळे अचानक पाय भाजल्याची कबुली त्याने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार येथील आर्यन सचिन शिंगोटे (वय ९ वर्ष) हा चिमुकला लहान असताना, त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. मुलाचा सांभाळ करण्यासाठी वडील सचिन रामेश्वर शिंगोटे यांनी कालांतराने दुसरे लग्न केले. दुसर्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा व एक मुलगी असल्याची माहिती आहे.
दरम्यान, सावत्र आई शारदाने आर्यनचा छळ केल्याची पोस्ट दोन दिवसांपासून सोशल मीडियावर जोमात फिरत होती. व्हायरल पोस्टमध्ये नमूद आहे की,चार दिवसांपूर्वी आर्यनची सावत्र आई शारदा हिने आर्यनचे हातपाय पकडून त्याला गरम तव्यावर उभे करून चटके दिले. त्याने आरडाओरड करू नये म्हणून त्याचे तोंडही दाबून ठेवण्यात आले होते. तीन दिवसांपासून आर्यन घराच्या बाहेर येत नाही, असे दिसल्याने शेजाऱ्यांनी घरात जाऊन बघितल्यावर हा धक्कादायक प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आला. शेजारच्यांनी त्याला त्वरित खामगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अकोला येथे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे आर्यनचे वडील सचिन शिंगोटे यांनी हा प्रकार डोळ्याने बघत असूनही मध्यस्थी केली नाही. असा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता.
दरम्यान, बोराखेडीचे पोलिस निरीक्षक माधवराव गरुड, पीएसआय अनिल भुसारी व सहकार्यांनी या व्हायरल पोस्टची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी शनिवारी जवळा बाजार गावात धडक दिली. परंतु आर्यन हा अकोला येथे भरती असल्याचे समजले. त्यामुळे पोलिस पथक अकोल्याकडे रवाना झाले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!