घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

तळेगाव दाभाडे : घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना तळेगाव दाभाडे  परिसरात घडली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना 24 एप्रिल ते 9 ऑक्टोंबर दरम्यान घडली.

आयुब ईस्माईल शेख (वय 35, रा. तळेगाव दाभाडे ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीने अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानंतर हा गुन्हा तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगी घरात झोपली असताना आरोपीने तिच्यावर लैंगिक आत्याचार केला. तसेच हे कोणाला सांगितले तर तुझ्या आईला ठार मारून टाकीन अशी तिला धमकी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक हिवरकर अधिक तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.