धक्कादायक ! पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार

पुणे : सर्वसामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी वाहणाऱ्या एका पोलिसाच्या मुलीचे तिच्या मित्रासह तिघांनी अपहरण करुन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी ( दि. २१) रात्री आठ वाजता तरुणीचे वडगाव शेरी परिसरातून अपहरण करण्यात आले होते.त्यानंतर तिला नगरमधील नेवासा येथे नेेत तिचा बलात्कार करण्यात आला.याप्रकरणी तिघांविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आला असून एकास अटक करण्यात आली आहे.

सागर मोहन सातव ( वय २८, रा.सातव वस्ती, वाघोली) याच्यासह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हास दाखल झाला असून सातव यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी एका पोलिस शिपायाची मुलगी आहे.पिडीत तरुणी ही २१ डिसेंबरला रात्री आठ वाजता वडगाव शेरी येथून रस्त्याने एकटी जात होती. त्यावेळी सागर व त्याचे दोन साथीदार कारमधून तिच्याजवळ आले.सागरने तरुणीला अडवून “मी तुझ्यासोबत लग्न करतो, तू माझ्या गाडीत बसली नाही तर मी जीवाचे बरेवाईट करून घेईल.’ अशी धमकी देत त्याच्याकडे असलेली विषारी औषधाची बाटली तरुणीला दाखविली. या प्रकारामुळे घाबरलेली तरुणी त्यांच्या गाडीत बसली. त्यानंतर त्यांनी तरुणीला गाडीमध्येच गुंगीचे औषध दिले. त्यामुळे तरुणी अर्धवट बेशुद्ध झाली. त्यानंतर त्यांनी तिचे हातपाय बांधून तिला नगरमधील नेवासा येथे नेले. तेथे त्यांनी तरुणीवर बलात्कार केला. या प्रकारानंतर तरुणीला त्यांच्या कारमधून पुन्हा पुण्यात आणून सोडले. घडलेल्या प्रकारामुळे तरुणीला धक्का बसला, मात्र तिने हा प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर तिने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास चंदन नगर पोलिस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.