पोलीस ठाण्यात स्वत:वर गोळी झाडून हवालदाराची आत्महत्या

नालासोपारा : तुळींज पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलाला मोठा धक्का बसला आहे. आश्चर्य म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच त्यांनी स्वतःला गोळी घालून आत्महत्या केली आहे.

पोलीस हवालदार सखाराम भोये (वय 42) असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव असून आत्महत्येच नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. गेल्या चार वर्षापासून पालघर जिह्याच्या तुळींज पोलीस ठाण्यात ते हवालदार म्हणून कार्यरत होते. या आत्महत्येने पोलीस गटात शोकाकुल वातावरण पसरलेलं पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडे सहा वाजताची ही घटना आहे. सखाराम यांच्या अशा जाण्यामुळे पोलीस दल हादरले आहे. सखाराम यांनी ऐवढं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

धक्कादायक बाब म्हणजे सखाराम भोये यांनी पोलीस ठाण्यातच गोळी मारून आत्महत्या केली. यामुळे पोलीस दलालाही मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर तात्काळ सखाराम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून पुढली तपास सुरू केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पोलीस हवालदार भोये यांनी ज्या पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या केली, ते शासकीय पिस्तुल आहे. आपत्कालीन परिस्थितीत सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना ते वापरता येते, असे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी सांगितले. भोये यांनी आत्महत्येपूर्वी कुठल्याही प्रकारची चिठ्ठी लिहिलेली नव्हती. कामाच्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. चौकशीनंतर भोये यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे उपायुक्त पाटील यांनी सांगितले. मयत सखाराम भोये पत्नी आणि मुलासह नालासोपारा पुर्वेच्या प्रगतीनगर येथे रहात होते. २००३मध्ये ते पोलीस दलात दाखल झाले होते.

धक्कादायक बाब म्हणजे सखाराम भोये यांनी पोलीस ठाण्यातच गोळी मारून आत्महत्या केली. यामुळे पोलीस दलालाही मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर तात्काळ सखाराम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून पुढली तपास सुरू केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.