मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई : MD शिक्षणाकरता सरकारी कोट्यातून अॅडमिशन मिळवून देण्याचा बनाव रचणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. मुंबईतील सायन हॉस्पिटलचे उपअधिष्ठित्याला अटक करण्यात आली आहे.राकेश रामनारायण वर्मा (वय- 54 वर्षे) असं आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी आलिशा शेख (रा. मध्यप्रदेश) यानी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायन रूग्णालय मेडीकल कॉलेजमध्ये सरकारी कोट्यातून MD ला अॅडमिशन देतो असं आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून आरोपीने  एकूण 50 लाख रुपये मागितले. आरोपी राकेश वर्मा याने 50 लाखांपैकी 21 लाख 10 हजार त्यांच्या बॅंक खात्यामार्फत घेतले होते. पण बराच पाठपुरावा करुन देखील आपले अॅडमिशन काही होत नाही, हे लक्षात आल्यावर आलिशा यांच्या फिर्यादीवरून सायन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार पोलिसांनी राकेश वर्मा यांची चौकशी केली आणि त्या चौकशीत त्यांनी सरकारी कोट्यातून अॅडमिशन मिळून देण्याचे आमिष दाखवल्याचे निष्पन्न झाले. त्यासाठी त्यानं 50 लाख रुपये स्वीकारल्याचे समोर आलं आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.