जावयानेच सासुवर केली जबरदस्ती , विनयभंगाचा गुन्हा दाखल

 

गोविंदपूरा : एका महिलेने आपल्या जावयावर विनयभंगाचा आरोप केला आहे . महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे . सोमवारी रात्री महिला तिच्या घरामध्ये पूजा करत असताना , रात्री आठ च्या सुमारास जावई तिथे आला .
तिने त्याला दुसऱ्या रूममध्ये आराम करायला सांगितले .
तक्रार नोंदवणारी महिला ही भोपाळमधील गोविंदपुरा भागामध्ये राहते .

त्याच दिवशी रात्री १२.३० च्या सुमारास महिला पाणी आणण्यासाठी म्हणून विहिरीवर गेली होती . ती घरी आल्यावर जावयाने तिला त्याच्या रूम मध्ये बोलावले व जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला , असे पोलिसांनी सांगितले .

महिलेने रात्री उशिरा गोविंदपुरा पोलीस ठाणे गाठले व जावयाविरोधात तक्रार नोंदवली . तिच्या तक्रारीवरून जावयाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे .
आरोपीला अटक करण्यासाठी या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे .

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.