पवनानगर बाजारेठमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृत देह

 

पवनानगर(नवनाथ आढाव): पवनानगर बाजारेठ मध्ये असलेल्या गणेश मंदिरात सोमवारी (दि.२१) सकाळी ०८.०० वा अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना घडली. सीमा गणेश यादव(पो.पाटील)या सकाळी गणेश मंदिरात दर्शनासाठी गेले असता तिथे एक अनोळखी पुरुष जातीचा इसम वय वर्षे अंदाजे ३० ते३५ हा निपचीत झोपलेला दिसला त्याच्या जवळ जावून पाहिले असता त्याची काही हालचाल होत नसल्याने त्यांनी पोलिसांना फोन केला व जवळच्या सिध्दीविनायक हॉस्पिटल च्या डॉक्टरांना बोलावले डॉक्टरानी जागीच तपासून त्याला मयत घोषित केले .
ही माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. परंतु मयताच्या मृत्युचे कारण व मृताचे नाव ही माहीत झालेले नसुन त्याचा पुढील तपास पो. स ई लवटे व पो. ना सतोष शेळके पो गवारी हे करीत आहे

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.