पुण्यात दोन बिल्डर मध्ये राडा; ऑफिस पेटवून देत आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : आर्थिक कारणावरुन बांधकाम व्यावसायिकांमध्ये वाद होऊन एकाने भागीदाराच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करीत कार्यालयाची जाळपोळ केली. तसेच स्वत: पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (ता.२४) दुपारी अडीच वाजता धनकवडी येथे घडली.याप्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.दोन बिल्डर मध्ये झालेल्या वादाने खळबळ उडाली आहे.

हसमुख बाबूलाल जैन (रा. ईशा पैलेस, गुलटेकडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भरत मीठालाल नागोरी (वय 61, रा. गंगा ईशान्य सोसायटी, शंकर महाराज मठाजवळ, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे व्यापारी आहेत. त्याचे शंकर मठा शेजारी ऑफिस आहे.दरम्यान फिर्यादी,आरोपी जैन आणि अन्य भागीदारानी 2006 मध्ये ईशा ग्रुप नावाची भागीदारी कंपनी सुरु केली होती. त्यामध्ये फिर्यादी, जैन आणि स्वर्णसिंग सोहल हे 2014 पासून संचालक होते. 2014 मध्ये जैन याने ईशा ग्रुप कंपनीमधील ईशा स्ट्रक्चर्स कंपनीतील राजीनामा दिला. त्यानंतर भागीदाराचा वाद न्यायालयात गेला.

फिर्यादीचे आणि जैनचे पूर्वीचे आर्थिक व्यवहार आणि अन्य कारणासाठी वाद सुरु होते. दरम्यान, गुरुवारी दुपारी जैन फिर्यादीच्या शंकर महाराज मठाजवळच्या गंगा नक्षत्र प्रकल्पमधील कार्यालयात गेला. त्यानंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करुन बाहेर काढले. कार्यालय आतून बंद करुन कार्यालयाची तोडफोड केली. तसेच तेथेच आग लावून आत्महत्येचा प्रयत्न केला.भरदिवसा हा प्रकार घडल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता. माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पाहणीकरून गुन्हा दाखल केला आहे. यात 20 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.