बिबवेवाडीतील खुनी हल्ल्यातील दुसऱ्या तरूणाचा मृत्यू, पुर्वी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून भरदिवसा दोघांचा खून
पुणे : पुर्वी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून दोन तरुणांवर काही जणांनी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी पालघनाने वार करुन खुन केला. ही घटना बिबवेवाडी परिसरातील गंगाधाम रस्त्याव शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरामध्ये भितीचे वातावरण पसरले होते. बिबवेवाडी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
सलीम मेहबुब शेख (वय 24) आणि तौफीक शेख (वय 27) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनिल कचरावत असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सलीम शेख व संशयित आरोपी कचरावत यांची एकमेकांशी ओळख होती. पुर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून कचरावत व त्याचे साथीदार बिबवेवाडीतील गंगाधाम रस्ता परिसरात आले. त्यावेळी सलीम व तौफीक शेख हे दोघेजण तेथे थांबले होते. त्याने दोघांना शिवीगाळ करीत सलीम शेख याच्यावर पालघनाने वार केले. तर सलीमचा मित्र तौफीक याच्यावरही कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेनंतर आरोपी तेथून पळून गेले.
स्थानिक नागरीकांनी सलीम व तौफीक या दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र सलीमला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारांपुर्वीच मृत्यु झाला. तर तौफीक हा देखील गंभीर जखमी झाला होता पण त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. मात्र, वाद सोडविण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. त्यानंतर अनिल हातात सळई घेउन रस्त्याने बिनधास्तपणे फिरत होता. त्यानंतर एका वाहतूक कर्मचाऱ्याने त्याला पाहून ताब्यात घेतले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!