पश्चिम महाराष्ट्रात घरफोड्या करणारी मध्यप्रदेशातील चोरांची टोळी गजाआड
सांगली : सांगलीसह, सातारा, कोल्हापूर, पुण्यात घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने गजाआड केले आहे.त्यांच्याकडून हत्यारे, मिरचीपूड, चांदीच्या वस्तू आणि घड्याळ असा 23 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या टोळीने काही दिवसांपूर्वीच इस्लामपूर येथे तीन घरफोड्या केल्या होत्या. तसेच सांगलीतील अहिल्यानगर येथेदेखील घरफोडी केली होती. त्यांच्याकडून पाटण येथील 3, इस्लामपूर येथील 3 आणि सांगलीतील दोन घरफोड्या आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
केरम उर्फ केरमसिंग रमेश मेहडा (वय 30), उदयसिंग रेमसिंग मेहडा (वय 23), गुड्या उर्फ गुडिया ठाकूर मेहडा (वय20) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अटक केलेल्या आरोपीकडून राज्यातील अनेक ठिकाणी केलेल्या घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, ताब्यात घेतलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तसेच या टोळीतील जगदीश मानसिंग सिंगाड हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. या टोळीचा प्रमुख केरमसिंग मेहडा हा दोन वर्षांपूर्वी इस्लामपुरातील राजारामबापू सहकारी साखर कारखान्यामध्ये बगॅस विभागात काम करत होता. त्यावेळी त्याने या परिसराची संपूर्ण माहिती घेतली होती. त्यानंतर त्याने त्याच्या साथीदारांच्या साथीने घरफोड्या सुरु केल्या असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!