पवनानगर बाजारपेठेतील वाहतुक कोंडीने स्थानिक हवालदिल
पवनानगर (नवनाथ आढाव): सध्या नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे मुंबईतील नागरिकांनी पवनाधरण परिसरात आगेकूच केलेली दिसते आहे. संपुर्ण पवना परिसरात एकमेव बाजारपेठ म्हणुन ओळख असलेल्या पवनानगर परिसराला वाहनांच्या गर्दिचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आधीच अरुंद रोडमुळे वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यात बाहेरुन आलेल्या वाहनांमुळे वाहनांच्या मोठ-मोठ्या रांगा लागल्याचे दिसत आहे. स्थानिक नागरिक या कायम स्वरुपाच्या वाहतुक समस्येमुळे अगदी मेटाकुटीला आलेत त्यात ही भर….वाहतुक पोलीस कर्मचाऱ्यांच्या ठिसाळ नियोजनामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. किमान सध्याच्या काळात तरी कायमस्वरूपी वाहतुक कर्मचारी उपस्थित असावा ही सर्वसामान्य नागरिक मागणी करीत आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!