फेसबुकवर मैत्री करत तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आत्महत्येस प्रवृत्त केले

पिंपरी चिंचवड : सोशल मीडियावरून चॅट करत एका महिलेने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगून पैशाची मागणी करणाऱ्या व ते न दिल्यास समाजात बदनामी करण्याची धमकी प्रेमिकेने दिल्याने तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी आळंदी पोलिसांनी खेड तालुक्यातील कोयाळी बापदेव वस्ती येथील एका तरुणीला अटक केली आहे.

संगीता (प्रिया) राजेंद्र देशमुख (रा. कोयाळी बापदेव वस्ती, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. आकाश दादाभाऊ पोकळे (वय 20, रा. कोयाळी, बापदेव वस्ती, ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मयत तरुण आकाश याची बहीण हर्षदा योगेश कोळेकर (वय 22, रा. कोयाळी, खिरपाड वस्ती, ता.खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 18 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत कोयाळी, खिरपाड वस्ती येथे घडली आहे. मयत आकाश याचे लग्न झाले नव्हते. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपी संगीता हिने त्याच्याशी फेसबुक या सोशल मीडियावरून चॅटिंग केली.आकाशला गोडगोड बोलून त्याला प्रेमाची भूरळ पाडली. त्याच्या सोबत प्रेमसंबंध निर्माण केले. आकाश याला आपल्याबरोबर शारीरीकनसंबंध निर्माण करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याच्याकडे पैश्यांची मागणी करण्यास सुरुवात.केली. पैसे न दिल्याने नातेवाईक व समाजात बदनामी करण्याची धमकी दिली..या धमक्यांमुळे आकाशला मानसिक त्रास झाला. त्यातून त्याने आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मोबाईलवरील चॅटींग तपासल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून तरुणीला अटक केली आहे.आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.