भर रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे, ताथवडे चौकातील घटना; आरोपी अटकेत
पिंपरी चिंचवड : आई, भावासह जाणार्या अल्पवयीन मुलीबरोबर भर रस्त्यात सर्वांसमोर ताथवडे चौकात एकाने अश्लिल कृत्ये केले. त्यानंतर या प्रकाराबाबत तक्रार दिल्यास संपूर्ण खानदानाला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 26) सायंकाळी सहा वाजता ताथवडे चौकात घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
आसिफ महम्मद शेख (वय २१, रा. भुजबळ वस्ती, ताथवडे, वाकड) असे अटक केलेल्या रोडरोमियोचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपला मुलगा व मुलीसह ताथवडे चौकातून पायी घरी जात होते.यावेळी आसिफ शेख हा अचानक त्यांच्यासमोर आला त्याने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्या गालाचा किस घेतला.त्यानंतर भर चौकात तिच्या अंगावरुन हात फिरवून तिला गच्च पकडून धरुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. शेख याने जाताना तुम्ही माझ्या विरोधात तक्रार दिल्यास तुमचे संपूर्ण खानदानाला जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली.भर रस्त्यावर हा प्रकार घडल्याने हे संपूर्ण कुटुंब भांबावून गेले होते.वाकड पोलिसांनी शेख याला अटक केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!