विनापरवाना पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडाला अटक, २ पिस्तुलांसह ४ काडतुसे जप्त

पुणे : विनापरवाना पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने अटक आहे. त्याच्याकडून २ पिस्तुलांसह ४ काडतुसे जप्त करण्यात आली.ही कारवाई पुयातील घाेरपडे उद्यान परिसरात करण्यात आली.रोहित दिलीप माने (वय २८, रा. लाेहियानगर) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुन्हे शाखेचे युनिट १ चे पथक घोरपडे पेठेत गस्त घालत होते. त्यावेळी गंभीर गुन्हे दाखल असलेला माने हा घोरपडे उद्यान परिसरात थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार सापळा रचून मानेला अटक करण्यात आले. त्याच्याकडून २ पिस्तुले आणि ४ काडतुसे असा १ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आली. माने याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, मारामारी, शस्त्र बाळगणे अशा स्वरुपाचे ९ गुन्हे दाखल आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, सतीश भालेकर, योगेश जगताप, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, शशीकांत दरेकर, तुषार माळवदकर यांनी ही कामगिरी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.