सहा महिन्याच्या गर्भवती महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद: वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशन परिसरातील सादातनगर येथे घडली.गर्भवती महिलेने आत्महत्या केल्यामुळे तिच्यासोबत पोटातील वाढत असलेले बाळ देखील दगावले असून कुटुंबातील सदस्यांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.रुफेदा बेगम असलम बेग (वय १९, रा. सादातनगर) असे मयत महिलेचे नाव आहे

मिळालेल्या माहितीनुसार,रुफेदा आणि असलम यांचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. ती सहा महिन्यांची  गर्भवती देखील होती. काही महिन्यातच घरात नवा पाहुणा येणार म्हणून घरातील वातावरण अगदी आनंदी होत. रुफेदा यांचा पती अस्लम हा कॅनॉट प्लेसमध्ये मोबाईल शॉपीत काम करत आहे. आज सकाळी ७ वाजता तिने पतीला झोपेतून उठवले.

नेहमीप्रमाणे पत्नी रुफेदाने अस्लमला झोपेतून कामावर जाण्यासाठी उठवले. मात्र, असलम ने आज कामावर जायचे नसून सुट्टी घेणार असल्याचे पत्नीवर रूफेदा ला सांगितले, आणि तो पुन्हा पुन्हा झोपी गेला. अस्लम झोपी गेल्यानंतर  रुफेदाने वरच्या मजल्यावरील स्टुल खाली आणून बेडरुममधील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.सकाळी ८:३० ते ९ वाजेच्या सुमारास अस्लम झोपेतून उठल्यावर त्याला पत्नीने गळफास घेतल्याचे दिसले.

यावेळी त्याने आरडाओरड केल्यावर घरातील लोक त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांनी ओढणी कापून रुफेदाला खाली उतरवले. यानंतर सातारा पोलीस आणि मयताच्या माहेरी फोेन करून घटनेची माहिती कळविण्यात आली. तिला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले असता अपघात विभागाच्या डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले.

सदर आत्महत्या प्रकरणीया पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गर्भवती असल्यामुळे ती आनंदी होती. रुफेदा हिचे काल गुरुवारी माहेरी बोलणे झाले होते.  मात्र, इतक्या आनंदी वातावरणात देखील रुफेदाने अचानक इतक्या टोकाचा निर्णय का घेतला?  असा प्रश्न नातेवाईक आणि पोलिसांना पडला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.