जिल्हास्तरी समुपदेशन महाअंतिम फेरी प्रवेश प्रक्रिया 31 डिसेंबर पर्यंत
सातारा : सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील चौथ्या प्रवेश फेरीच्या समाप्तीनंतर शिल्लक राहिलेल्या जागा जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी द्वारे भरण्यासाठी खालील वेळापत्रकानुसार उपलब्ध राहणार आहेत.
29 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 30 डिसेंबर 2020 दु. 5 वाजेपर्यंत दिलेल्या वेळ व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशनाकरिता बोलाविणे व प्रवेशाकरिता उपलब्ध जागा, उमेदवारांची मागणी, उमेदवारांची अर्हता या आधारावर प्रवेशाच्या जागांचे वाटप करणे.
29 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 वाजल्या पासून ते 31 डिसेंबर 2020 दु. 5 वाजेपर्यंत या प्रवेश फेरीत जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणी नंतर संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिलेल्या मुदतीत प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात येईल. अधिक माहितीसाठी औद्यागिक प्रशिक्षण संस्था, सातारा मोळाचा ओढा सातारा येथे संपर्क साधवा.दुरुध्वनी नं.02162 – 250331 असे प्राचार्य औद्यागिक प्रशिक्षण संस्था, सातारा यांनी कळविले आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!