महत्वाचे! वाहन परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, परमिटच्या वैधतेला 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ

नवी दिल्‍ली : केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, परमिट यासारख्या वाहनविषयक कागदपत्रांची वैधता कोविड-19 चा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे. यात 1 फेब्रुवारी 2020 किंवा 31 मार्च 2021 रोजी वैधता संपणाऱ्या सर्व कागदपत्रांचा समावेश आहे. यामुळे नागरिकांना सामाजिक अंतर राखून वाहतुकीशी संबंधित सेवा मिळविण्यात मदत होईल. मंत्रालयाने आज यासंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मार्गदर्शक सूचनांचे महत्त्व समजून योग्य रितीने याची अंमलबजावणी करावी, जेणेकरुन कोरोना महामारीच्या काळात नागरीक, वाहतूकदार आणि इतर संघटनांना त्रास होणार नाही, अशी विनंती केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.