करोनासाठी १४७० कोटी खर्च,अर्थसंकल्पाच्या शिलकीतून आणखी ४०० कोटींची मागणी.

मुंबई : कोरोना संसर्ग रोखणे आणि बाधितांसाठी आरोग्य व्यवस्था उभारण्याकरिता मुंबई महापालिके ला आतापर्यंत १,४७० कोटींचा खर्च आला असून पालिके च्या आकस्मिकता निधीमध्ये आता के वळ २९ कोटी शिल्लक राहिले आहेत. करोनासंबंधी खर्चासाठी आधीच अर्थसंकल्पातून ४५० कोटींचे अंशदान घेण्यात आले असून येत्या काळात आणखी खर्च करावा लागणार असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातून आणखी ४०० कोटींचे अतिरिक्त अंशदान करावे, अशी विनंती प्रशासनाने स्थायी समितीकडे केली आहे.

कोरोनामुळे मुंबई महापालिके च्या खर्चात विशेषत: आकस्मिक निधीच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. करोनासाठी के लेल्या उपाययोजनांचा खर्च या आकस्मिक निधीतून करण्यात आला आहे. हा निधी संपल्यानंतर अर्थसंकल्पाच्या शिलकीतून अतिरिक्त ४५० कोटी रुपये आकस्मिकता निधीत वळवण्यात आले आहेत. आतापर्यंत ही रक्कमही खर्च झाली असून आता या शिलकीतून आणखी ४०० कोटी आकस्मिकता निधीत वळते करावेत अशी मागणी वित्त विभागाने स्थायी समितीकडे के ली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवण्यात आला आहे. या आठवडय़ात होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. आधीच पालिके चे उत्पन्न घसरलेले असताना दुसरीकडे खर्च वाढत चाललेला आहे. त्यामुळे स्थायी समिती यावर कोणता निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पालिके च्या आकस्मिकता निधीमध्ये चालू आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला ८५२.५७ कोटी रुपये निधी शिल्लक होता. राज्य सरकारकडून करोनाच्या खर्चासाठी ६० कोटींचा निधी देण्यात आला होता. तसेच २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात आकस्मिकता निधीसाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात आली होती. या एकू ण १२१२ कोटींपैकी ११८२ कोटी आधीच खर्च झाले आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या १६४४ कोटी रुपये शिलकीतून ४५० कोटी आकस्मिकता निधीतून आधीच प्रशासनाने वळते के ले व तेदेखील खर्च झाले आहेत. आता त्यातून आणखी ४०० कोटी रुपये आकस्मिकता निधीत वळते करावेत, अशी मागणी प्रशासनाने के ली आहे.

असा झाला खर्च

करोनाच्या प्रसारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता विविध रुग्णालये, २४ विभाग कार्यालये यांना विलगीकरण कक्ष उभारणे, औषधोपचार, उपकरणे खरेदी, अलगीकरण कक्षासाठी कं त्राट पद्धतीने खासगी डॉक्टरांची नियुक्त, चाचण्या, प्रयोगशाळांची क्षमता वाढविणे, नवीन प्रयोगशाळा स्थापन करणे आदी कामांसाठी हा निधी खर्च के ला आहे.

आकस्मिक निधीचा जमा-खर्च

जमा

८५२.५७ कोटी आकस्मिकता निधीमध्ये १ एप्रिल २०२० ची शिल्लक

६० कोटी करोनासाठी राज्य सरकारकडून प्राप्त झालेली रक्कम

३०० कोटी अर्थसंकल्पात आकस्मिक निधीला दिलेले अंशदान

४५० कोटी आकस्मिक निधीला दिलेले अतिरिक्त अंशदान

खर्च

१४७०.९५ कोटी कोविडसाठी झालेला खर्च

१६१.६९ कोटी कोविडव्यतिरिक्त झालेला खर्च

२९.९३ कोटी आकस्मिक निधीमध्ये शिल्लक.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.