मोठी बातमी! 1 जानेवारीपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp बंद होणार?

मुंबई : व्हॉट्सॲप हे जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय ॲप म्हणून ओळखलं जाते. मात्र काही अँड्रॉईड फोन आणि आयफोन युजर्सला व्हॉट्सॲपचा वापर करता येणार नाही. कारण काही ठराविक फोनमध्ये WhatsApp ची सेवा बंद होणार आहे. त्यामुळे त्या युजर्सला त्यांचे फोन अपग्रेड करावे लागणार आहे.

नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपकडून जुन्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी आपला सपोर्ट बंद केला जातो. त्यानंतर पुन्हा नवीन ऑपरेटिंग सिस्टमसाठी व्हॉट्सअ‍ॅपकडून लिस्ट जाहीर केली जाते. 2021च्या सुरूवातीस, म्हणजे 1 जानेवारीपासून काही जुन्या अँड्रॉइड फोन आणि आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप बंद होईल.

मिळालेल्या रिपोर्टनुसार, Android 4.0.3 किंवा यापेक्षा कमी Version वर चालणाऱ्या अँड्राईड स्मार्टफोनवरील WhatsApp बंद होणार आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे या Version वर चालणारे अँड्राईड फोन असतील, तर तुम्हाला व्हॉट्सॲप वापरण्यासाठी ते अपग्रेड करावे लागणार आहे.

त्यासोबतच जर तुम्ही आयफोन युजर्स असाल आणि तुमच्याकडे iOS 9 किंवा यापेक्षा जुन्या वर्जनचे सॉफ्टवेअर असेल, तर ते तुम्हाला अपडेट करावा लागेल. त्याशिवाय जर तुमचा फोन फार जुना झाला असेल किंवा तो अपडेट होऊ शकत नसेल, तर मात्र तुम्हाला नवा फोन खरेदी करावा लागू शकतो.

‘या’ Android फोनवर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही

जे फोन अँड्रॉइड  4.0.3 वर काम करत नाही, अशा डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. यामध्ये HTC Desire, LG Optimus Black, Motorola Droid Razr, Samsung Galaxy S2 यासारखे मॉडल्स आहेत. दरम्यान, तुमचा फोन कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालू आहे, हे तुम्हाला माहिती नसल्यास, ते जाणून घेण्याचा मार्ग खूप सोपा आहे. यासाठी, तुम्हाला तुमच्या आयफोन किंवा अँड्रॉइडच्या सेटिंग्जवर जावे लागेल.- जर तुम्ही आयफोन युजर आहात, तर यासाठी तुम्ही आधी Settings मध्ये जा. – त्यानंतर General  वर टॅप करा.- Information वर गेल्यानंतर तुम्हाला आयफोनच्या सॉफ्टवेअरची माहिती मिळेल.

 

लगेच अपडेट करा फोन

अँड्राईड युजर्सला सर्वात आधी Settingsवर जावे लागेल. त्यानंतर  येथे About Phone मध्ये जाऊन युजर फोनच्या ऑपरेटिंग सिस्टमविषयी माहिती मिळू शकेल. ज्यांच्याजवळ फोन अपडेट करण्याचा ऑप्शन आहे, त्यांनी त्वरित नवीन सॉफ्टवेअरसह अपडेट करावे, तर ज्या युजर्संना फोन अपडेट करण्याचा ऑप्शन नाही, त्यांना व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी नवीन फोन खरेदी करावा लागेल.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.