स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, 5 महिलांची सुटका

पिंपरी चिंचवड : अवैद्यरित्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या ‘स्पा’ मसाज सेंटरवर छापा टाकून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग पथकाने 5 महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई ही कारवाई सोमवारी (दि. 28) दुपारी पावणे पाच वाजता पिंपळे सौदागर येथील kunlya thai spa या मसाज सेंटरवर करण्यात आली.या कारवाईत ‘स्पा’ ची मॅनेजरला अटक करण्यात आली असून मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद विश्वनाथ घाटोळकर (वय 34, रा. गोकुळधाम हाऊसिंग सोसायटी, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी घाटोळकर हा स्पा सेंटरचा मॅनेजर आहे. त्याच्यासह स्पा सेंटरचा चालक मालक भरत पवार (वय 27, रा. काळेवाडी) याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय कांबळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिंपळे सौदागर येथे नाशिक फाटा रोडवर एका इमारतीमध्ये kunlya thai spa या मसाज सेंटरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची  माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर सोमवारी दुपारी पावणे पाच वाजता छापा टाकला. त्यात पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली.

आरोपी विनोद आणि भरत हे सुटका केलेल्या महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. त्यातून मिळालेल्या रकमेतून आरोपी आपली उपजीविका भागवीत होते. पोलिसांनी स्पा सेंटरचा मॅनेजर विनोद याला अटक केली आहे. तर स्पा सेंटरचा मालक भरत याचा शोध पोलीस घेत आहेत. सांगवीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,  पोलीस उप-आयुक्त (गुन्हे)  सुधीर हिरेमठ,  सहा. पोलीस आयुक्त. प्रेरणा कट्टे. यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सपोनि निलेश वाघमारे, सपोनि डॉ. अशोक डोंगरे, सपोफी विजय कांबळे, पोहवा संदिप गवारी, पोना. अनिल महाजन, पोना महेश बारकुले, पोना नितीन लोंढे, पोना भगवंता मुठे, पो.शि. राजेश कोकाटे, पोशि मारोतराव जाधव, पोशि योगेश तिडके, पोशि मारुती करचुंडे, मपोना वैष्णवी गावडे, मपोना संगिता जाधव, मपोशि सोनाली माने, मपोशि योगीनी कचरे यांनी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.