जुन्नर हादरलं! अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार, अश्लील फोटो काढले

जुन्नर : शिवणकामासाठी गावातील शिवणकाम करणाऱ्या दुकानात गेलेल्या आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना जुन्नर तालुक्यातील तांबे येथे घडली आहे. तसेच पीडित मुलीचे फोटो काढून या घटनेबाबत कुणाला सांगितले तर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी तीन युवकांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पॉक्सो) व अनुसूचित जाती जमाती अत्याचार या कलमान्वये तीन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, एक आरोपी फरार आहे.

या प्रकरणी सौरभ भगवान वाळूंज, आदित्य गुलाब कबाडी यांना अटक केली असून करण शिवाजी वाळूंज (सर्व राहणार तांबे, ता. जुन्नर) हा फरार झाला आहे. या घटनेची फिर्याद पीडित अल्पवयीन मुलीने सोमवार (ता. 28) रोजी जुन्नर पोलिस ठाण्यात दिली. या घटनेचे तीव्र पडसाद परिसरात उमटले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ”रविवार (ता. 20) रोजी पीडित अल्पवयीन मुलगी व तिच्या बहिणीची मुलगी या शिवणकामासाठी गावातील शिवणकाम करणाऱ्या दुकानात गेल्या होत्या. दुकानातून घरी परत येत असताना सौरभ वाळूंज व त्याचा मित्र करण यांनी त्यांचा पाठलाग केला. बैलगाडा घाटाच्या वरच्या बाजूला ज्वारीच्या मळ्याजवळ या दोघांनी पीडित मुलीला ओढून शेतात नेले. त्या नंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.

पीडित मुलीचे फोटो काढून या घटनेबाबत कुणाला सांगितले तर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडित मुलीने या घटनेबाबत कुणालाही सांगितले नाही. घटनेनंतर दोन्ही युवक त्यांचा मित्र आदित्य गुलाब कबाडी याच्या गाडीवर बसून पळून गेले. मात्र या घटनेबाबत मुलीच्या आईला समजल्यानंतर मुलीकडे विचारपूस केली असता फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे याबाबत सांगितले नसल्याचे पीडित मुलीने आईला सांगितले.

पोलिस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे व पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन दोन आरोपींना अटक केली. फरार अरोपीचा शोध सुरू असून त्याला लवकरच अटक केली जाईल.अशी माहिती पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.