‘थर्टी फर्स्टसाठी रेव्ह पार्टीची तयारी एनसीबीने उधळली, आयोजकास अटक अन् चरस-गांजा जप्त

मुंबई : नववर्षानिमित्त रेव्ह पार्टीची तयारी करत असलेल्या एका इव्हेंट आयोजकाला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने ( एनसीबी ) ठाण्यातून अटक केली आहे. एनसीबीने अटक केेलेल्या आरोपीकडून मोठ्या प्रमाणात चरस व गांजा आदी अंमली पदार्थ जप्त केले आहेत. तपासा दरम्यान बर्‍याच तरुणांनी या पार्टीसाठी बुकिंग केली असल्याचे समोल आले आहे. आरोपीने जम्मू-काश्मीरमधून ड्रग्स मागवले असल्याची माहिती एनसीबीला मिळाली आहे.अशरफ मुस्तफा शहा असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. तो वागळे स्ट्रीट येथे राहतो.

आरोपी  नवीन वर्षापूर्वी  रेव्ह पार्टी आयोजित करणार असल्याची माहिती एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना मिळाली होती. रेव्ह पार्टीसाठी त्याने मोठ्या प्रमाणात  ड्रग्जची व्यवस्था केली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील मुलुंड चेक नाकाजवळ सापळा रचून आरोपीस अटक केली. एनसीबीच्या पथकाने आरोपीची अंगझडती घेतली आणि घटनास्थळाचा शोध घेतला असता जवळच 4 किलो चरस सापडला.त्यानंतर एनसीबी पथकाने आरोपीची कसून चौकशी केली. त्यानंतर ठाणे पश्चिमेस या व्यतिरिक्त पथकाने एका व्यक्तीच्या घराची झडती घेतली आणि येथून 11 किलो गांजा सापडला.

एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की,  अशरफ मुस्तफा शहा थर्टी फर्स्टसाठी रेव्ह पार्टी आयोजित करणार होता आणि या पार्टीमध्ये तो या ड्रग्जची विक्री करणार होता. तपासणी दरम्यान, हे स्पष्ट झाले आहे की, बर्‍याच तरुणांनी या पार्टीसाठी बुकिंग केले होते. शाहने जम्मू-काश्मीरमधून ड्रग्स मागवले असल्याची माहिती एनसीबीला मिळाली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.