पुण्यात महाविद्यालयाच्या प्राचार्यांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
पुणे : पुण्यातील औंध परिसरातील एका उच्चभ्रू.सोसायटीत राहणाऱ्या प्राचार्य असलेल्या एका व्यक्तीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हि घटना सोमवारी रात्री 10 वाजता औंध येथे घडली. परीथवाड यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.
गजानन वैजनाथ परीथवाड (वय 60) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य होते.परीथवाड यांना दोन मुले असून दोघेही परदेशात असतात. पुण्यात ते पत्नीसोबत राहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, औंधमधील नागरस रस्त्यावरील हर्ष पैराडाईज या सोसायटीमध्ये गजानन परीथवाड राहत होते. सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली.सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने ही घटना पाहिली. त्याने याबाबत सोसायटीतील नागरीकांना माहिती दिली. त्यानंतर सोसायटीच्या इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान सोसायटीतील रहिवासी असणाऱ्या एका डॉक्टरांनी त्यांना तपासले आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परीथवाड यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहुन ठेवली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले. परीथवाड यांची दोन्ही मुले जर्मनी व स्वीडन येथे वास्तव्यास आहेत. तर ते त्यांच्या पत्नीसमवेत तेथे राहात होते.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!