बलात्कार करून तीन वर्षीय चिमुरडीचा खून, पेणमध्ये किळसवाणा प्रकार

पेण : पेण शहरातील प्रायव्हेट हायस्कूलच्या माठीमागे असणा-या मळेघर आदिवासी वाडीवरील तीन वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करून तीचा खून करण्यात आल्याच घटना घडली आहे. प्रकरणी पेण पोलिसांनी एक तासात आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला अटक केली असल्याची घटना आज सकाळी घडली.

आदेश मधूकर पाटील (वय 34 रा.साबर सोसायटी, मुळ गाव गागोदे पेण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेण शहरातील मळेघर आदिवासी वाडीवरील कुटुंब रात्री आपल्या घरात झोपले होते. मात्र सदर घराला दरवाजा नसल्याचे पाहून त्याच परिसरात राहणारा आरोपी आदेश यांंने रात्री 11 ते 12 च्या दरम्यान तीच्या घरात प्रवेश करून तीला जवळपास 200 मिटरवर उचलून नेले व तीच्यावर अतिप्रसंग करून तीचा खून केला.

यावर कुटुंबांनी शोधाशोध केली असता त्यांना सदर मुलाचा अदांज समजल्यावर त्या वर्णनानुसार पेण पोलिस पथकांने आरोपीच्या घरी जावून आरोपीला ताब्यात घेतले. सदर तपासाअंती या मुलानी दोन वेळा असेच प्रकार केले असून यापुर्वी अटक होता सदर प्रकार हा अतिशय घृणास्पद तसेच काळीमा फासणारी घटना आहे.

याप्रकरणी आरोपीवर कलम 376 (i)(j),363,366(A),448,302,201बाल लैंगिक अत्याच्यार पोस्को, अधिनियम 2012 कलम 4,6,8,12 सह अनुसूचित जाती अन्याय अत्याचार अधिनियम 1989, व सुधारण अधिनियम 2015 चे कलम 3(I)(w), (i)(ii), 3 (2) (v) प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी डीवायएसपी विद्या चव्हाण,पीआय बाळकृष्ण जाधव,पी. आर.कुंभार,पोलिस उपनिरीक्षक आव्हाड,एलसीपीच्या कोमन,कदम यासह इतर पोलिस कर्मचारी यांची विशेष पथक म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.