एकच मास्क वापरणे हे विनामास्क फिरण्यापेक्ष्या घातक ; संशोधनातून धडकी भरवणारी माहिती आली समोर 

मुंबई : देशात कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरूच आहे. कोरोनावरील लस अजूनही बाजारात आलेली नाहीये. त्यामुळे आपण सध्या मास्कच्या मदतीने घराबाहेर पडत आहोत. सुरक्षित अंतर, स्वच्छता पाळून आपण सर्वजण कोरोना विषाणूशी लढा देत आहोत.

याचबरोबर कोरोनापासून बचाव होण्यासाठी सध्या अनेक नागरिक रियुजेबल मास्कचा वापर करत आहेत. कापडापासून तयार केलेले रेयुजेबल मास्क परवणारा आहे. याचबरोबर हे मास्क पर्यावरणासाठीसुद्धा अनूकुल आहे. एकच मास्क धुवून वापरणं आरोग्यास योग्य आहे का? याबाबत संशोधन करण्यात आले आहे.

याबाबत संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार सर्जिकल मास्कचा पुन्हा वापर करणे कोरोनापासून बचाव न होण्याचे मोठं कारण असल्याचे समोर आले आहे. संशोधनातून आलेल्या माहितीनुसार सर्जिकल मास्क तयार करण्यासाठी एब्जॉर्बल लेअर तयार केला जातो. यामुळे एकदा वापरल्यानंतर  पुन्हा तोच मास्क पुन्हा वापरल्यास सुरक्षा देऊ शकत नाही.

सर्जिकल मास्क निवडण्यापूर्वी तयार केलेल्या फॅब्रिकची तपासणी केली पाहिजे. दीर्घकालीन वापरादरम्यान त्याचे फॅब्रिक वारंवार धुतल्याने गुणवत्ता कमी होते. वारंवार वापरल्या जाणार्‍या स्वस्त गुणवत्तेच्या मास्कचा नैसर्गिकरित्या प्रभाव कमी होत असल्याचे संशोधकांनी सांगितले.

मास्क विकत घेताना या  गोष्टी लक्षात घ्या

आपण ट्रेंडी आणि फॅशनेबल मास्क वापरणार असाल तर त्याचे फॅब्रिक खरेदी करुन पहा. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अशा मास्कमधील थ्रेडवर्क सेक्विनमुळे (सजावटीसाठी कपड्यांवर तयार केलेल्या वस्तू) फॅशनेबल वाटू लागले असले तरी, वापरल्या जाणार्‍या कमी-गुणवत्तेच्या फॅब्रिकमुळे त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.

 

चांगल्या प्रतीचा मास्क असा असावा जो चेहरा झाकून ठेवू शकेल, पूर्णपणे सुरक्षित असेल. डिस्पोजेबल मास्क कधीही वापरु नये, पुन्हा वापरण्यायोग्य मास्कची गुणवत्ता कधीही कमी होऊ शकते. मास्क किती वेळा धुतले गेले, किती वेळा ते वापरले गेले हे महत्वाचं असतं. प्रवास करताना नेहमीच मास्क बदलत राहणं आवश्यक आहे.

 

मास्क वापरताना नाक, तोंड व्यवस्थित झाकलं जाईल असा मास्क निवडा.  मास्कचे इलास्टिक तपासून पाहा. जास्त घटट् किंवा सतत लूज होईल असा मास्क वापरू नका. मास्क फाटलेला असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी धोक्याची सुचना असू शकते, असा मास्क लगेचच फेकून द्या.

अति मास्कचा वापर घेऊ शकतो जीव…

मास्कबाबतची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.सतत मास्कच्या वापरामुळे कोरोनापासून बचाव होत असला तरी आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या वाढत असल्याचे समोर आले आहे. याबाबत डॉ. आयुष पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

डॉ. आयुष पांडे म्हणतात, ‘व्यक्तीसाठी मास्क घालणे आवश्यक नाही. मात्र मास्कचा वापर करावा जेव्हा तो एखाद्या आजारी किंवा कोरोना असलेल्या व्यक्तीची काळजी घेत असेल,’ असे त्यांनी सांगितले. याचबरोबर राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या म्हणण्यानुसार, जास्त काळ मास्क लावल्याने शरीराला नुकसान पोहचू शकते. म्हणूनच जास्त गर्दीच्या ठिकाणीच मास्कचा वापर करा, असा सल्ला देण्यात आला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.