दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीला मुद्देमालासह अटक

शिक्रापुर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.या टोळी कडून एकूण 8 लाख 38 हजार 638 रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गणेशन पेयांडी तेवर,तामिळनाडू,शिवकुमार करपैया तेवर,पंडियेन सेहदू वैकट,सरवान गणेशन लचामी,गणेशन ओच्च तेवर,तामिळनाडू,सेलवराज अंथन उनिखंडी,तामिळनाडू असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १ जानेवारीच्या बंदोबस्ताच्या अनुसंगाने नगररोडवर पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी संशयित गाडीला (TN 55 V2682) सापळा रचुन ताब्यात घेतली.यावेळी सदरच्या गाडीत वरील आरोपी मिळुन आले असून या टोळी कडून विविध कंपनीचे 6 मोबाईल तसेच 2 लहान मोठे लोंखंडी कोयते तसेच लोंखंडी पक्कड, स्क्रू ड्रायव्हर , लोखंडी पान्हे , तसेच एकूण 11 तोळे 700 ग्रॅम सोन्याचे दागिने 100 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली ओमीनी गाडी असा एकूण 8 लाख 38 हजार 638 रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हि कामगिरी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डाॕ.अभिनव देशमुख यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, लोणीकंद पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर,सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे,सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसरे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, सहायक फौजदार दत्तात्रय जगताप,दत्तात्रय गिरमकर,गुरु जाधव, राजेंद्र थोरात,मुकुंद आयचीत,राजू पुणेकर, निलेश कदम, महेश गायकवाड,उमाकांत कुंजीर, ज्ञानेश्वर क्षीरसागर, प्रमोद नवले,विजय कांचन,राजू मोमिन, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, नितीन भोर, जनार्दन शेळके, पो कॉ बाळासाहेब खडके, धिरज जाधव,पो कॉ उमेश कुतवळ,अक्षय जावळे, दगडू वीरकर यांनी केली आहे

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.