पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, २४ सराईत गुन्हेगार एकाचवेळी तडीपार

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड पोलिसांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली आहे. शहर पोलिसांच्या परिमंडळ एक मधून २४ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक निर्माण व्हावा, तसेच शहरात शांतता निर्माण होण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

या गुन्हेगारांना ३१ डिसेंबर २०२० पासून २ वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या कारवाईनुसार निगडी पोलीस स्टेशनमधील १०, पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीतील २, एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन (५), भोसरी पोलीस स्टेशन आणि चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीतून प्रत्येकी ३, चाकण पोलीस स्टेशन हद्दीतून १ अशा एकूण २४ सराईत गुन्हेगार तडीपार केले आहेत.

जानेवारी २०२० पासुन पोलीस उपआयुक्त परिमडळ ०१ मधुन यापुर्वी एकुण २५ सराईत गुन्हेगार यांना हद्दपार करण्यात आले आहे.पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड,स्थापण झाल्यापासुन एकाच वेळी २४ सराईत गुन्हेगार यांना पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्हया मधुन हद्दपार करण्याची ही पहीलीच कारवाई आहे.सध्य स्थीतीला परिमंडळ ०१, हद्दीतुन २०२० या वर्षामध्ये एकुण ४९ सराईत गुन्हेगार यांना हद्दपार करण्यात आले आहे.

सन २०२० मध्ये परिमंडळ २ मधुन आज पर्यंत ४४ सराईत गुन्हेगार तडीपार केले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातमधुन आज पर्यंत एकुण ९३ सराईत गुन्हेगार तडीपार करण्यात आले आहेत. त्याच बरोबर मोक्का ०८ कारवाई ज्यामध्ये ४४ गुन्हेगार व एमपीडीए ०२ असे एकुण १३९ सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हेगारी पासुन मुक्त करण्याकरिता भविष्यात याप्चर कारवाई करण्याचे नियोजित आहे.

तडीपार केलेले आरोपी

निगडी पोलीस ठाणे :

स्वानंद उर्फ चिक्या नागेश खरात (वय २२ रा.आंबेडकर नगर, थरमॅक्स चौक, कुंदन हुंडाई समोर, दुर्गामाता प्रोव्हिजन स्टोअर्सचे शेजारी, निगडी) संग्राम उर्फ आवळ्या गुरुनाथ भोसले (वय २७,रा. मिलिंदनगर, दत्ता वडापाव स्टॉल जवळ, सेक्टर नंबर २२,ओटास्किम, निगडी), धनंजय ऊर्फ बबल्या सुर्यकांत रणदिवे,(वय २०, रा.ओटास्किम, निगडी), विकी उर्फ विकास शिवाजी लष्करे (वय २३, रा.ओटास्किम, निगडी), निखील साहेबराव साठे (वय २६, रा. दळवीनगर,ओटास्किम, निगडी) आदर्श उर्फ छोट्या अशोक मगर (वय २१, रा.- राहुलनगर,ओटास्किम, निगडी), अख्तर उर्फ मुन्ना जमालुद्दीन शेख (वय २०, रा.चाँदतारा चौक,ओटास्किम, निगडी), आकाश ऊर्फ डडया बसवराज दोडमनी (वय २३, रा.ओटास्किम, निगडी), अजय रणजित शेंडगे (वय १९, रा. दळवीनगर, ओटास्किम, निगडी),संघर्ष उर्फ शक्या विष्णु भालेराव (वय 20, रा. ओटास्किम,निगडी).

 

पिंपरी पोलीस ठाणे :

अतुल उर्फ चाड्या अविनाश पवार (वय २८, रा. मिलींदनगर, पिंपरी), दिनेश विलास शिंगाडे (वय २५, रा. खराळवाडी, पिंपरी)

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे :

पवन बंडु शिरसाठ (वय २२, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी), सचिन डॅनियल खलसे (वय २५, रा. लांडेवाडी झोपडडपट्टी, भोसरी), रवि दिलीप गाडेकर (वष २५, रा. महात्मा फुले नगर झोपडपट्टी,भोसरी),पवित्रसिंग जोहरसिंग भोंड (वय ३०, रा.खंडेवस्ती झोपडपट्टी, भोसरी), इस्तीयाक इनामुल खान (वय २५, रा. संजय गांधीनगर, मोशी)

भोसरी पोलीस ठाणे :

विजय मनबहादुर थापा (वय २२, रा. विकास कॉलनी, लांडेवाडी, भोसरी),अभिजीत उर्फ सनी भिमराव खंडागळे, (वय ३०, रा. गुलाबनगर, दापोडी,) सचिन रामदास पवार (वय २८, रा.शांतीनगर झोपडपट्टी, भोसरी).

चिंचवड पोलीस ठाणे :

ज्ञानेश्वर दशरथ शिंदे (वय २०, रा. नागसेननगर झोपडपट्टी, चिंचवड), प्रदिप बैलाप्पा कांबळे (वय १९, रा. मोरया हौसिंग सोसायटी, चिंचवड), वशिम मुनीर शेख (वय २२, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड).

तर चाकण पोलीस ठाणे हद्दीतून माधय उर्फ महादेव रोहिदास गित्ते (वय २५, रा. भगतवस्ती, बालाजीनगर, ता.खेड).

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मंचक इप्पर, आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त सागर कवडे, राम जाधव, गणेश बिराजदार, संजय नाईक-पाटील, तसेच  देहुरोड विभाग व परिमंडळ मधील सर्व पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांनी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.