प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणीचे फोटो तिच्या घरच्यांना दाखवण्याची धमकी देत तिचा विनयभंग

पिंपरी चिंचवड : प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका तरुणाने तरुणीचे फोटो तिच्या घरच्यांना दाखवण्याची धमकी देत तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना ऑक्टोबर महिन्यात देहूरोड परिसरात घडली असून याप्रकरणी 30 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभव पांडुरंग बालघरे (वय 23, रा. चिंचोली गाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध आहेत. तरुणीने आरोपी सोबत प्रेम संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यावरून वैभव याने तिच्यासोबत काढलेले फोटो तिच्या घरच्यांना दाखवण्याची धमकी दिली. तसेच तिचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.