MPSC परीक्षा देणाऱ्यांसाठी मर्यादा, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना केवळ 6 संधी

मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता मर्यादा देण्यात आल्या आहेत. नवीन वर्षात म्हणजे 2021 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीरात निघालेल्या प्रत्येक परीक्षेसाठी हा नियम लागू असणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणेच आता राज्य लोकसेवा आयोगानेही विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी मर्यादा ठेवल्याने तेवढ्यात प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे.

स्पर्धा परीक्षा देण्याच्या कमाल संधींसंदर्भातील निर्णय ‘एमपीएससी’ने बुधवारी परिपत्रकाद्वारे संकेतस्थळावर जाहीर केला. शासकीय पदांसाठी राबवल्या जाणाऱ्या निवड प्रक्रियेतील सुधारणात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून उमेदवारांच्या संधी मर्यादित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२१मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीला अनुसरून होणाऱ्या परीक्षांपासून हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे ‘एमपीएससी’ने स्पष्ट के ले आहे.

आतापर्यंत उमेदवारांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी ‘एमपीएससी’कडून संधी निश्चित करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक उमेदवार सातत्याने स्पर्धा परीक्षा देऊन प्रयत्न करत राहतात. मात्र यूपीएससीकडून उमेदवारांच्या परीक्षा देण्याच्या कमाल संधी निश्चित करण्यात आल्या आहेत, त्याच धर्तीवर आता ‘एमपीएससी’नेही उमेदवारांच्या परीक्षेच्या संधी मर्यादित केल्या आहेत.

संधी कोणत्या?

कमाल संधींची संख्या निश्चित करतानाच या संधी कोणत्या हेही ‘एमपीएससी’ने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ती संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास तीही त्याची संधी समजली जाईल. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास त्याची परीक्षेस असलेली उपस्थिती संधीत गणली जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.