गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली येरवडा मध्यवर्ती कारागृहाची पहाणी

पुणे : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहास प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली.यावेळी राज्याचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा सुनिल रामानंद, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य शरद खटावकर, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यु. टी. पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना यशस्वीपणे राबविल्या, त्यामुळे कारागृहात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात यश आले. याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व कारागृह अधिकारी-कर्मचारी यांचे अभिनंदन केले. यावेळी श्री. देशमुख यांनी बंदीजनांशी सवांद साधत त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
आगामी काळात आधुनिक कारागृहे उभारण्याचा व बंदी क्षमता वाढविण्याचा मानस असल्याचेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.