मावळात डोक्यात व हातावर धारधार हत्याराने वार करत एकाची हत्या

कामशेत( नवनाथ आढाव) : डोक्यात व हातावर धारधार हत्याराने वार करत एका व्यक्तीची हत्या केल्याची घटना काल (दि. ३१ डिसेंबर) रात्री ११ च्या सुमारास मावळातील सांगिसे गावचे हद्दीतील मुंगळा आंबा डोंगरावरील आबाच्या झाडाजवळ घडली आहेेेे. याप्रकरणी कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाजीराव नानासाहेब गरूड (वय ६५ रा. सांगिसे, ता.मावळ, जि.पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विशाल उर्फ यशवंत साईनाथ गरूड (वय-२४वर्षे, व्यव-नोकरी, रा. सांगिसे, ता.मावळ, जि. पुणे यांनी फिर्याद दिली). त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (दि. ३१ डिसेंबर) रात्री ११ च्या सुमारास मावळातील सांगिसे गावचे हद्दीतील मुंगळा आंबा डोंगरावरील आबाच्या झाडाजवळ फिर्यादी यांचे चुलते मृत बाजीराव यांचा अज्ञात कारणावरूून डोक्यात व हातावर धारधार हत्याराने वार करत हत्या केली.त्यामुळे अज्ञात व्यक्ती विरोधात कामशेत पोलिस ठाण्यात ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.