मोहननगर परिसरात दोन गटात हाणामारी; तलवारी, कोयते घेत वाहनांची तोडफोड
पिंपरी चिंचवड : मोहननगर परिसरात गुंडानी हातात तलवारी, कोयते घेऊन रात्री साडेबारा च्या सुमारास वाहनांची तोडफोड केली. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शुक्रवारी (दि. 1) रात्री साडेबारा वाजता हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिंचवड मधील मोहननगर परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांसोबत हाणामारी करत काही जणांनी परिसरातील वाहनांची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी येऊन कारवाई केली. तासाभरात सर्व गुंडांच्या मुस्क्या आवळल्या. त्यांच्या सोबत अतिरिक्त पोलिस आयुक्त रामणाथ पोकळे, पोलिस उपयुक्त सुधीर हिरेमठ, सह आयुक्त, पोलिस निरिक्षक व मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मोहननगर, फुलेनगरला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. हि कारवाई रात्री तीन वाजेपर्यंत सुरू होती. यामधे स्वतः पोलिस आयुक्त उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहराची नवीन वर्षाची सुरुवात हाणामारी आणि तोडफोडीने झाली आहे. पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!